खटावला स्मशानभूमी शेडसाठी ७ लाखांचा निधी मंजूर
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रयत्नातून बौद्ध समाजाच्या मागणीला प्रतिसाद

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | खटाव येथे जनसुविधा योजनेतून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात स्मशानभूमी शेडसाठी सुमारे ७ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व त्यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब यादव यांचे खटाव येथील बौद्ध समाजाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.

गेल्या शंभर वर्षांपासून खटाव येथे स्मशानभूमी शेड नसल्यामुळे पावसाळ्यात अंत्यविधी करताना अडचणी येत होत्या. या समस्येबाबत शिवसेना बांधकाम कामगार संघटनेचे तालुकाप्रमुख परशुराम बनसोडे, तालुका संघटक हनुमंत कांबळे, किरण कांबळे, मिथुन कांबळे, दत्तू कांबळे, सोमलिंग कांबळे, रवींद्र कांबळे, माजी सरपंच शंकर कांबळे, सागर कदम, संजय कांबळे, शाखाप्रमुख विजय कांबळे यांनी पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊन वस्तुस्थिती आणि छायाचित्रांसह माहिती दिली.
त्यावर तत्पर प्रतिसाद देत पालकमंत्री पाटील यांनी आपल्या विशेष फडातून जनसुविधा योजनेअंतर्गत ७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बौद्ध समाजाकडून डिजिटल फलक लावून पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
बौद्ध समाजाने पुढील काळातही समाजाच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी अशाच प्रकारे सहानुभूती दाखवून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.