महाराष्ट्रराजकीय

आमदार अपयशी, मतदार आक्रमक ; शिंदेवाडीचा मतदानावर बहिष्कार

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

मिरज | शिंदेवाडी येथील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकत सत्ताधाऱ्यांना जोरदार धक्का दिला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यकाळात गावात अपेक्षित विकासकामे न झाल्याने संताप उफाळून आला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, वीज व आरोग्य सुविधांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असून केवळ आश्वासनांचीच पखरण झाल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. विकासाचा लेखाजोखा मागूनही दुर्लक्ष झाल्याने जागरूक मतदारांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. मतदान हा लोकशाहीतील अधिकार असला तरी तोच बहिष्काराच्या रूपाने वापरून शासनाचे लक्ष वेधले जाईल, असा ठाम संदेश शिंदेवाडीने दिला आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही