बदली रद्द करा, अन्यथा शाळेला टाळे ठोकू, नी रस्त्यावर उतरू ; संतप्त विद्यार्थी व पालकांचा प्रशासनाला इशारा

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
बऱ्याच वर्षापासून संत गतीने चालणारी शाळा सांगली – मिरज – कुपवाड शहर महानगरपालिका सहकार महर्षी विष्णू आण्णा पाटील विद्यामंदिर मनपा शाळा क्र.23, सांगली (सेमी इंग्लिश शाळा) कोरोना महामारी काळातनंतर 70 मुलां-मुलींपासून सुरु करण्यात आलेल्या शाळेत आज 170 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, ज्या शिक्षकांमुळे ही शाळा पुन्हा नावलौकीक मिळवू लागली त्या शिक्षकांची बदली नियमावर बोट ठेवून केल्याने विद्यार्थ्यांसह पालकांत प्रचंड असंतोष उफाळून आला आहे.
आज 25 ऑक्टोबर रोजी सर्व पालक व विद्यार्थ्यांनी शाळेसमोरच जोपर्यंंत आमच्या शिक्षकांची बदली रद्द होत नाही, तोपर्यंत शाळेत जाणार नाही तसेच शाळेला टाळे ठोकू आणि रस्त्यावर उतरू, अशी भुमिका घेत प्रशासनविरोधात रोष व्यक्त केला. त्यातच बदली करण्यात आलेल्या शिक्षकांचे आदेश रद्द करा, अन्यथा आमच्या पाल्यांची टि. सी. द्या, ही भूमिका घेतल्याने अजूनच गोंधळ वाढला.
मनपाच्या शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करीत असतांना मनपा शाळा क्र.29 साखर कारखाना येथील शाळेतील सरसकट सर्वच शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचे प्रशासन म्हणत असले तरी या बदली प्रकियेत अधिकारी यांनी आपण जे म्हणू तीच दिशा ठरवल्याने अनेक शिक्षकांवर अन्यायही झाल्याचे दिसून आले आहे.
मनपा शाळा क्र. 29 मध्ये मुलांना मारहाणीच्या प्रकरणानंतर निलंबनाची कारवाई केलेल्या शिक्षकांच्या जागेवर सांगली महानगर पालिका प्रशासन मंडळाकडून शाळा नंबर 23 चे शिक्षक यांची बदली करण्यात आली. विशाल भोंडवे याना शाळा क्र. 29 येथील शाळेत हजर राहण्याच्या सूचना प्रशासन मंडळाकडून देण्यात आल्या.
मनपा शाळा क्र. 23 मधील विद्यार्थांनी आमचे शिक्षक आम्हाला परत करा, या मागणीला जोर धरत विद्यार्थांनी शासन व प्रशासनाचा निषेध नोंदविला. विशाल भोंडवे या शिक्षकांची बदली रद्द होत नाही, तोपर्यंत विद्यार्थीही शाळेत बसणार नसल्याची भूमिकाच विद्यार्थांनी घेत शिक्षकांची बदली करणारे शिक्षण मंडळाचे अधिकारी जोपर्यत येऊन आम्हाला आश्वासन देत नाहीत. तोपर्यंत शाळेला टाळे ठोकून शाळेबाहेरील रस्त्यावर आम्ही रस्ता रोको करणार, असा इशारा संतप्त विद्यार्थी व पालकांनी दिला आहे.