कचरा डेपोच्या थकीत कराच्या नवीन सुरस गाथा ; महापालिकेच्या आश्वासनाच्या भाकड कथा
LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज | वड्डी ता.मिरज ग्रामपंचायत हद्दीतील कचरा डेपो चे थकीत कराच्या नवीन सुरस कथा समोर येत आहेत. ग्रामपंचायत कर थकबाकी न दिल्यामुळे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या विरोधात ग्रामपंचायत प्रशासनाचा कचरा डेपोसमोर बेमुदत आंदोलनाला आता राजकिय वळण लागल्याने परिस्थिती गंभीर होणार आहे. कचऱ्यावरून वाद पेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने वड्डी ग्रामपंचायतीचा वेळोवेळी कर बुडावल्याच्या विरोधात ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा डेपोसमोरच आता बेमुदत आंदोलनाला सुरवात केली आहे. जोपर्यंत महापालिकेकडून कर भरणा होत नाही तोपर्यंत महापालिकेच्या गाड्या अडवून कत्तलखाण्यासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे.
मिरज तालुक्यातील बोलवाड गावचे माजी लोकनियुक्त सरपंच व अखिल भारतीय सरपंच परिषद मिरज तालुका अध्यक्ष आणि भाजपचे नेते मा.सुहास (दादा) पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या ठिय्या आंदोलनास नुकताच पाठिंबा जाहीर केला आहे.