कर्नाटकातील नागरिकांची मिरज पोलिसांकडून लूट

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने

मिरजेत वाहतूक पोलिसांचे काम आणि ताण कमी करण्यासाठी आता पोलिसांनी देखील त्याचा ताण आपल्या डोक्यावर घेतल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेची बाब एवढी मनावर घेतली आहे की आता शहर पोलिस देखील स्वता: जातीने लक्ष घालून वाहतूक पोलिसांची मदत करत आहेत. तर वाहतूक पोलिसांची कामे हलके व्हावेत, यासाठी शहर मधील दोन पोलिस यांनी वाहनांची तपासणी केली आहे. विशेषत: बेडग रोड आणि वड्डी रस्त्यावर उभा राहणाऱ्या या दोघा पोलिस कर्मचाऱ्यांची दक्षता खूपच चर्चेत आहे.

सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे दोघे पोलिसदादा आपली ड्युटी प्रमाणिकपणे करत जातीने लक्ष घालून कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांची तपासणी करतात. कोठे ही कायद्याचा भंग होत नाही ना ? हे ते पाहत असतात. त्यांची विशेष कर्नाटक येथील वाहनावर करडी नजर असते. कर्नाटकातील वाहन धारकांना ते चांगलेच धारेवर धरुन त्यांच्याकडून काही मलई मिळते का? हे पाहत असतात. हे रोजचे झाल्याने या दादांना कर्नाटकातील वाहन धारक हे वैतागले आहेत. रोज सकाळी उठल्यानंतर कर्नाटकातील नागरिकांना या दोघा पोलिस दादांचेच चेहरे दिसतात. हे दादा देखील हूशार आहेत. ते वेळ बघून थांबतात सकाळी बेडग रस्ता तर दुपारी वड्डी रस्ता यांच्यामुळे आता कर्नाटकातील नागरिकांची लूट होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

तसेच वारंवार नागरिकांनी तक्रार केली आहे. पण ह्या दादाकडे मशीन देखील असते ते ऑनलाइन दंड मारुन देखील गाडी सोडत नाहीत. यांच्या हातामध्ये सर्व काही असेल तर आता वाहतूक पोलिस यांची बदली करुन वाहतूक शाखाचं बरखास्त करतात का? हे आता बघावं लागणार आहे.