कालकथित मातोश्री शोभाबाई विठ्ठल गमरे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप………

सौजन्य आयु. रूपेश गमरे
दिनांक 26 जुलै 2024 महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आंबेतचे सुपुत्र दिवंगत दीपक विठ्ठल गमरे यांच्या मातोश्री बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा म्हसळा यांचे सरचिटणीस रुपेश दीपक गमरे यांच्या आजी, भीम ज्योत महिला मंडळ आंबेत अध्यक्षा कालकथीत शोभाबाई विठ्ठल गमरे यांचे 26 जुलै 2021 रोजी निधन झाले. त्यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्ताने बौद्धजन सेवा मंडळ आंबेत यांच्या सहकार्याने त्यांच्या कुटुंबीयांनी गावातल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले यावेळी बौद्धजन सेवा मंडळ आंबेत या मंडळाचे अध्यक्ष यशवंत गमरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंत पवार बौद्धजन पंचायत समिती तालुका उपाध्यक्ष हे होते. प्रमुख उपस्थित आयु.सुधीर आंबेतकर. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाणू साळवी (स्थानिक शाखा सचिव) यांनी केले तर तृतीय पुण्यस्मरण निमित्ताने कार्यक्रमाला आयु अनंत पवार, यशवंत गमरे, जानू साळवी साळवी मोहन गमरे, लक्ष्मण साळवी, बुद्धिझम टाइम्सचे संस्थापक काय अंकुश गायकवाड , बौद्धउपासक आयु.रमेश तांबे , महिला अध्यक्षा तालुका रश्मी तांबे, स्थानिक महिला अध्यक्षा प्रभाताई साळवी माजी अध्यक्षा विजयाताई मोरे, स्थानिक सचिव मोनिकाताई मोरे, उपस्थित होते . गावातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वही ,कंपास पेन ,पेन्सिल ,वाटप करण्यात आले यावेळी जानु साळवी यांनी तृतीय पुण्यस्मरणना निमित्त कालकथीत शोभाबाई विठ्ठल गमरे यांच्या जीवनचरित्रावर शोक व्यक्त करत असताना त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी केलेल्या अपर कष्टाची आठवण करून देऊन गोरगरिबांना खाऊ घालणारी अन्नपूर्णा मातोश्री आज निघून गेल्याचे खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच स्थानिक अध्यक्ष यशवंत गमरे यांनी आज रुपेश डोंगरे आणि त्यांचे कुटुंबीय यांचा आधारवड त्यांचे आजी होते त्यांच्यामुळे आज त्यांना चांगले दिवस आले आहेत व त्याची जाणीव त्यांच्या कुटुंबीयांना आहे असे म्हटले या कार्यक्रमासाठी त्यांचे नातू निलेश दीपक गमरे यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केले. कार्यक्रमाला त्यांची सुनबाई मालिनी दीपक गमरे, जावई संजय रामदास ,जाधव विजय जाधव , दिलीप जाधव,नाती नीलम संजय जाधव हिना विजय जाधव रुपेश दीपक गमरे हेमंत दीपक गमरे नात सून अंजली रुपेश गमरे, पण ती अनन्या रुपेश गमरे, आरांश रुपेश गमरे, तसेच रोहित क्षितिजा अभिजीत असे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते तसेच महिला मंडळाचे व स्थानिक मंडळाचे सभासद उपस्थित होत. आपल्या आजीच्या तृतीया पुण्यस्मरणनिमित्ताने शैक्षणिक साहित्य वाटप, असा समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेऊन खऱ्या अर्थाने आपल्या आजीने केलेले कुशलकर्म या कुटुंबीयांच्या माध्यमातून दिसून येते. तसेच त्यांचे नातू हे गेले अनेक वर्ष बौद्धजन पंचायत समितीमध्ये या रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये धार्मिक ,सामाजिक उपक्रमामध्ये एक महत्त्वपूर्ण सामाजिक कार्यकर्ता म्हणून कामकाज करत आहे. आणि ही संधी त्यांच्या आजीमुळेच त्यांना प्राप्त झालीअसे कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंत पवार यांनी म्हटले केले . श्रद्धांजली वाहून या तृतीय पुण्यस्मरणानिमित्ताने कालकथित शोभाबाई विठ्ठल गमरे यांना अभिवादन करण्यात आले








