ग्रा.पं.ला लागली भ्रष्टाचाराची कीड ; चौकशीला मुहुर्त मिळेना बिडीओला घेणार का लीड….

LiVE NEWS | UPDATE
लातूर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
शिरूर अनंतपाळ प्रतिनिधी | लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी (घुगी) ग्रामपंचायतीत 15 व्या वित्त आयोगांतर्गत आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा गंभीर गैरवापर झाल्याचा आरोप करत, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय छ. संभाजीनगर येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तक्रारदार सौदागर महमदरफी पाशामियाॅं (संस्थापक अध्यक्ष) आणि माजी सरपंच व्यंकटराव रामराव बिरादार यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ग्रामसेवक शिवराज एकोर्गे, सरपंच श्रीकला शेंडकर आणि शाखा अभियंता रूपाली हटकर यांनी संगनमत करून काम न करता कागदोपत्री काम दाखवले व निधीचा अपहार केला.
ठळक मुद्दे, GPS लोकेशन, फोटो व व्हिडिओद्वारे पुरावे सादर करून ऑनलाईन रिसिप्टद्वारे निधी उचलल्याचे पुरावे देऊनही सदर भ्रष्टाचाराकडे गंभीर दुर्लक्ष करणाऱ्या गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना सहआरोपी बनवून शिस्तभंगाची व दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणीचे चौकशी आदेश असूनही अहवाल अद्याप सादर नाही
चौकशीसाठी त्रिसदस्यीय बाह्य समिती नेमण्याची ठाम मागणी
तक्रार असूनही चौकशी अहवाल सादर करण्यात विलंब करणे तसेच तक्रारदाराला माहिती न देणे हे गंभीर प्रशासकीय दुर्लक्ष असून जबाबदार अधिकाऱ्यांनीही पदाचा दुरुपयोग करून भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करण्यात आला आहे.
● परजिल्ह्याची त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून समक्ष तपास करावा.
● दोषी सरपंच, ग्रामसेवक व अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ निलंबन.
● दोषींना वाचविणाऱ्या गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी.
सदरील चौकशीची कारवाई झाली नाही तर छ. संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर “बेमुदत आमरण उपोषण अटळ!” असा स्पष्ट इशारा तक्रारदारांनी दिला आहे.