जीप व दुचाकीच्या धडकेत आईसह दोन मुलांचा मृत्यू तर एकजण जखमी ; दुचाकीचा चक्काचूर

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
सांगलीतील कुमठे – तासगाव फाट्याजवळ दुचाकी आणि प्रवासी जीपची समोरासमोर धडक होऊन हृदयद्रावक अपघात झाला. या अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू तर एकजण जखमी झाल्याची घटना सकाळी घडली आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा व आईचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या कवलापूरजवळ दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव प्रवासी जीपने दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबाला धडक दिली. या अपघातामध्ये दिपाली विश्वास म्हारगुडे (२८ वर्षे), सार्थक (७ वर्षे) आणि राजकुमार (५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर विशाल दादासो म्हारगुडे (३० वर्षे) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील जखमी आणि मृत हे सर्वजण आटपाडी येथील तळेवाडी येथे राहणारे आहेत.
विशाल म्हारगुडे हे मुळचे आटपाडीचे असून सांगली येथे वास्तव्यास आहेत. ते दुचाकीवर पत्नी आणि दोन मुलांना घेऊन लग्नासाठी जात होते. त्याचेवळी समोरून येणाऱ्या भरधाव प्रवासी जीपने दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळावर मोठी गर्दी झाली. जखमी झालेल्या विशाल यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण त्यांची प्रकृती देखील खूपच गंभीर आहे. अपघातानंतर जीप चालक तेथे न थांबता पसार झाला. सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच तत्काळ धाव घेतली. अपघातस्थळी शेकडो नागरिकांची गर्दी जमली होती. दोन भावंडासह आईचा अपघाती मृत्यू झाल्याचे पाहून हळहळ व्यक्त होत होती