तलाठी, मंडल अधिकाऱ्यांचे पंचनामे खोटे ठरले ! महसूल विभागाचे मुरूम तस्करांना पोसण्याचे भांडे फुटले…

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | खंडेराजूरी येथील तलाठी, मंडल अधिकाऱ्यांनी अवैध मुरूम उत्खननन व सुरूंग स्पोट होत नसल्याचा दिलेला पंचनामा खोटा ठरला आहे. खाणपट्टा मुदत संपलेल्या जमिनीत राजरोजपणे २५ ते ३० फूट खोल बोर मारून मुरूम तस्करांकडून स्फोट घडविल्याने स्फोटाचा पुरावा तक्रारदार विनोद कोळी यांनी तहसिलदारांना पाठवल्याने तस्करांना पाठीशी घालण्याचे अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.
खंडेराजूरी येथील शेतकरी विनोद कोळी यांनी विनापरवाना उत्खनन व सुरुंगाच्या वापराने बोरचे पाण्यावर परिणाम व द्राक्ष बागेचे नुकसान होत असल्याची यापूर्वी लेखी तक्रार केली आहे. मात्र, प्रशासनाने याची दखल घेवून तस्करावर कारवाई करण्याऎवजी त्यांना पाठीशी घातले गेल्याने कारवाईचे भय नसलेल्या मुरूम तस्करांनी महसूल विभागाच्या आशिर्वादाने गेल्या आठवडा भरापासून पुन्हा भाडे पट्ट्याचा परवाना संपलेल्या गट नंबर ८५ मध्ये पुन्हा सुरुंगाचे स्फोट घडविल्याने परिसर हादरुन गेला.
खंडेराजूरीत विनापरवाना मुरूम उत्खननासाठी 30 फूट खोल बोर मारून सूरूंग उडवत आहेत. याबाबत तक्रार केली असता अधिकाऱ्यांकडून कारवाईचा फार्स केला जात आहे. तलाठ्यांनी प्रत्यक्ष दर्शनी कोणताही सूरुगं उडवला नसल्याचा अहवाल दिला होता मात्र, मंगळवारी सुरुंगासाठी लावलेल्या बोरचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडिया व तहसीलदारांना तक्रारदार विनोद कोळी यांनी टाकल्याने महसूल विभागाचे तस्करांना पोसण्याचे भांडे फुटल्याने खळबळ उडाली आहे.
जिथे सुरुंग उडवले जातात त्यांच्यापासून जवळच लघु पाटबंधारे चा म्हैशाळ योजनेचा मोठा तलाव आहे, तसेच अनेक शेतकऱ्यांचे बोरचे पाणी गेले आहे , द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे, घरांची पडझड झाली आहे. तरी सुद्धा या मुजोर मुरूम तस्करांना महसूल विभाग पाठीशी घालते का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
“या प्रकाराबाबत आलेल्या तक्रारीची दखल घेवून विनापरवाना सुरुंगाचा वापर व गौण खनिज उत्खननाच्या चौकशीसाठी नायब तहसिलदारांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर दोषीवर कारवाई करु. असे आवाहन अर्पणा मोरे-धुमाळ (तहसीलदार, मिरज) यांनी केले आहे.