बोलवाड गावच्या विकासाची सचिन कांबळेंकडे सूत्र ; गावातील कट्टर राजकीय विरोधकचं झाले एकत्र
महादेव दबडे (मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख, राष्ट्रवादी अजितदादा गट) यांच्याकडून जाहीर सत्कार
LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
सांगली जिल्ह्यातील बोलवाड गाव हे नेहमी चर्चेत असणारे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सचिन दादा कांबळे व सुहास पाटील हे गट गावात काम करत होते. बोलवाड ग्रामपंचायत मध्ये सुहास दादा पाटील गटाची सध्या सत्ता आहे. सचिन दादा कांबळे गटाचे पाच सदस्य आहेत. तरीही सचिन दादा कांबळे यांना उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे.
गावच्या सर्वांगीण विकासासाठी सुहास दादा पाटील व सचिन कांबळे गावच्या विकासासाठी एकत्र आले आहेत. राजकारणामध्ये काहीही होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बोलवाड गाव इथून पुढच्या काळात सुद्धा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मध्ये एकत्र राहूनच काम करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे इथून पुढच्या काही दिवसांमध्ये बोलवाड गावचा चेहरा मोहरा बदलून टाकणार असल्याची माहिती नूतन उपसरपंच सचिन कांबळे यांनी दिली आहे.