मोहन वनखंडेंकडून विराट शक्तीप्रदर्शन करत भरले दोन उमेदवारी अर्ज ; पक्षाच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा दावा

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क
संपादक | जयंत मगरे
महाराष्ट्रात येत्या 20 नोव्होंबरला विधानसभा निवडणूक होणार असून विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. तर उद्या 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख आहे. अशातच राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघातून मोहन वनखंडे सर यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत काँग्रेस पक्ष तसेच अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
मोहन वनखंडे सर यांनी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत विराट शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराणा प्रताप चौक येथून फटाक्यांची आतिषबाजी करत शक्तीप्रदर्शन रॅली काढण्यात आली होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना मात्र, काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म अद्याप मिळाला नसून पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यामुळे काँग्रेस पक्ष तसेच अपक्ष असा अर्ज दाखल केला आहे. अर्ज माघार मुदततीपर्यत एबी फॉर्म मिळेल, अशी आशा मोहन वनखंडे सर यांनी व्यक्त केली आहे. तर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजय मेंढे यांनी महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल तो मान्य असेल, अशी माहिती दिली आहे.
यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, शहराध्यक्ष संजय बापू मेंढे, काँग्रेसचे नेते आयाज नायकवडी, माजी नगरसेवक करण जामदार यांच्यासह मिरज पूर्व भागातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.