महाराष्ट्र राज्य

कराड विधानसभा मतदार संघात मतदार नोंदणीत बोगसगिरी ; प्रशासन कारवाईची पार पाडणार का जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बोगसगिरीचा केला पंचनामा, कोणती घेणार भूमिका, जागृत कार्यकर्त्यांचा प्रशासनाला रोखठोक सवाल

सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नेते मंडळींनी बोगस मतदार नोंदणी करून घेण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. याबाबतच्या विविध तक्रारींची चौकशी सुरू असतानाच 259 कराड-उत्तर विधानसभा मतदार संघात मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत झालेली बोगस मतदार नोंदणी रद्द झाली पाहिजे व बोगस नोंदणी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी करत कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षच्या वतीने मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आज निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हंटले आहे की, २५९ कराड-उत्तर विधानसभा मतदार संघात मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत कराड-उत्तर विधानसभा मतदार संघात दि. o५/०९/२०२४ते दि. १२/०९/२०२४ या कालावधीत वापरकर्ता ‘सतीश सर’ या एका नावाने मोबाईल क्र. ७८८७४८२११५ वरून हजारमाची येथील एका व्यक्तीच्या वीज बिलावर वारंवार खाडा-खोड करून पुराव्याचे कागदपत्र या सदराखाली वीज बिलाची प्रत ऑनलाईन अपलोड केलेली आहे.

स्थलांतरीतांसाठी नमुना नं. ८ चे एकूण ४६२ ऑनलाईन अर्ज दाखल करून आयोगाच्या ऑनलाइन सुविधेचा गैरवापर करून नमुना नं. ८ या अर्जाव्दारे स्थलातर बेकायदेशीरपणे दाखवण मतदार नोंदणी केलेली आहे. यामुळे आयोगाची फसवणूक झालेली आहे. ही बाब फार गंभीर स्वरूपाची असून लोकशाहीतील कायद्यातील तरतुदीचा भंग करणारी आहे. याप्रक्रियेसाठी आवश्यक ती कागदपत्रे घेणे गरजेचे असताना निव्वळ लाईटबीलाच्या आधारे नावनोंदणी करणे हे शंकास्पद आहे.

अशा नोंदी विधानसभा मतदार संघात इतर ठिकाणी झाले असण्याची शक्यता आहे. याबाबत सखोल चौकशी करुन बोगस नोंदी झालेल्या मतांच्या नोंदीबाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणेत यावी. त्याबाबत दि. o४/०८/२०२४ रोजी एका वृत्त पत्रामध्ये मा. जिल्हाधिकारीसाो सातारा यांनी प्रसिध्दीस दिलेल्या बातमीनूसार बोगस मतदार नोंदणी करणे, याबाबत कडक कारवाईचा इशारा देण्यात आला होता. तरी सुध्दा आपल्या सुचनांकडे दुर्लक्ष करून संबंधित व्यक्तीने जाणूनबुजून वरीलप्रमाणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे.

त्याबाबत सदर व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी, ही विनंती जर कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांचे वतीने तीव्र आंदोलन करून उपोषणास पदाधिकारी बसतील याची नोंद घ्यावी. तरी संबंधीत व्यक्तींवर कायद्यातील तरतुदी नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सुनील माने, कराड उत्तरचे अध्यक्ष देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, कांतीलाल पाटील, सौ. संगिता साळुंखे, प्रशांत यादव, भास्करराव गोरे, उध्दवराव फाळके, बाळासाहेब सुर्यवंशी, आनंदराव कोरे, पै.संजय थोरात, अविनाश माने, लालासाहेब पाटील, दिलीपराव थोरात, नंदकुमार बटाणे, ॲड.चंद्रकांत कदम, ॲड. प्रताप पाटील, जयहनुमान घाडगे, गंगाधर जाधव, दयानंद पवार, निवास चव्हाण, धनाजी माने, सुरेश पाटील, अजय सूर्यवंशी, पोपटराव साळुंखे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही