शांती सम्राट शेतकरी गटातील शेतकऱ्यांना ज्वारी बियाणे वाटप

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | खटाव येथील “शांती सम्राट शेतकरी गट क्र. १” या शेतकऱ्यांच्या गटाला कृषी विभागामार्फत ज्वारी बियाणांचे वाटप करण्यात आले. “शांती सम्राट शेतकरी गट क्र. १” या गटाच्या शेतकऱ्यांना प्रहारचे तालुकाध्यक्ष परशुराम बनसोडे यांच्या प्रयत्नाने जिल्ह्याचे कृषी अधीक्षक विवेक कुंभार व मिरज तालुका कृषी अधिकारी निंबाळकर यांच्या सहकार्याने १०० किलो ज्वारी बियाण्यांचे नियोजन करून खटाव गावात वाटप करण्यात आले.
खटाव गावात प्रथमच शांती सम्राट २५ शेतकऱ्याचा गट स्थापन करून शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेण्याचे शेतकऱ्यांनी ठरवले होते. त्या अनुषंगाने खटाव गावातील बौद्ध मंदिर या ठिकाणी २५ शेतकऱ्यांना प्रत्येकी चार किलो असे एकूण १०० किलो ज्वारी बियाण्यांचे वाटप करण्यात आले. खटावतील बौद्ध शेतकऱ्यांना ज्वारी बियाणे मिळावे यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक तालुका कृषी अधिकारी निंबाळकर यांच्याकडे ज्वारी बियाण्यांची प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष परशुराम बनसोडे व हनुमंत कांबळे यांनी मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने बौद्ध मंदिर या ठिकाणी कृषी सहाय्यक सचिन पवार यांच्या उपस्थितीत ज्वारी बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी परशुराम बनसोडे (तालुकाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष,मिरज), हनुमंत कांबळे (सामाजिक कार्यकर्ते), तमन्ना कांबळे (ग्रामपंचायत सदस्य), कलाप्पा कांबळे, मिथुन कांबळे, श्याम कांबळे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.