शिस्तीला तडा, नेतृत्वाला झडा ; प्रशासन झोपेत, नागरिकांना फटका कडा

LiVE NEWS | UPDATE
लातूर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
देवणी विशेष प्रतिनिधी | राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ‘पाच दिवसांचा आठवडा’ लागू केल्याचा आनंद काही कर्मचारी इतक्या उरावर घेऊन फिरत आहेत की कार्यालय वेळेवर येणे विसरलेच आहेत. विशेषतः देवणी तहसील कार्यालयात तर शिस्तीलाच तडा गेला आहे, आणि यासाठी पूर्ण जबाबदारी तहसीलदार सोमनाथ वाडकर यांच्यावरच येते, असं जनतेतून स्पष्टपणे बोललं जात आहे.
शासनाने सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.३० या वेळेत उपस्थित राहण्याचा आदेश जाहीर केला. पण देवणी तालुक्यातील तहसील कार्यालयात १० जुलै २०२५ रोजी सकाळी ११.१३ वा. ‘जनसामान्याचा कायदा’ चे प्रतिनिधी पोहोचले तेव्हा अपवाद वगळता एकही अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित नव्हता. उलट नायब तहसीलदारांच्या केबिनलाही कुलूप लावलेले दिसले. हे दृश्य GPS व गुगल व्हिडिओद्वारे चित्रीत केले गेले आहे. “देवणी तहसीलमध्ये नो टाइमिंग, तहसीलदारांची खुर्ची आहे, जबाबदारी नाही.”
उदगीर व लातूर येथून येणारे अनेक कर्मचारी रोजच उशिरा म्हणजे ११-१२ वाजेनंतर येत असतात. पाच दिवसांचा आठवडा मिळूनही या हलगर्जी कर्मचाऱ्यांना काही फरक पडलेला नाही. उलट, जनतेच्या कामात प्रचंड खोळंबा होत असून तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली जनता ताटकळत बसलेली दिसते.
या सगळ्याचा मुळ उद्देश आणि जबाबदार कोण?
तहसीलदार सोमनाथ वाडकर त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयात ना शिस्त आहे, ना वचक. कर्मचारी मनमानी करत असून कोणत्याही प्रकारची कार्यशिस्त बाळगली जात नाही. तहसीलदारांनी जर का वेळेचे काटेकोर पालन, अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाई व लोकांच्या कामाचा विचार केला असता, तर ही स्थिती उद्भवली नसती.
जनतेचा संतप्त सवाल “जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर आणि उपविभागीय अधिकारी शरद झाडके हे थेट कारवाई करतील का?”
जनतेमध्ये स्पष्टपणे चर्चा सुरू आहे की, “हा तहसीलदार फक्त खुर्ची सांभाळतो आहे की कारभार?”
तहसील कार्यालय हे जनतेसाठी आहे, कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीसाठी नाही. आता शिस्तीचा बडगा उचलण्याची वेळ आली आहे.” ‘दांडी तहसील’ म्हणून ओळख मिळवणाऱ्या देवणीचे तहसीलदार आता तरी जागे होतील का?”