सर्वपक्षीय माजी नगरसेवक आणि नेत्यांचा डॉ.सुरेश खाडेना उघड पाठिंबा जाहीर ;

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
राज्यात विधानसभा निवडणूक येत्या नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे आता साऱ्यांना वेध लागले असून त्या अनुषंगाने राजकीय पक्षाकडून रणशिंग फुंकले जात आहे. दरम्यान, मिरज पॅटर्न मधील सर्व नेते मिळून पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार करणार आहेत. सर्वपक्षीय माजी नगरसेवक आणि नेत्यांनी आज सुरेश भाऊ यांना उघड पाठिंबा जाहीर केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी मिरज पॅटर्न मधली नेतेमंडळी यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केला होता. त्यावेळी अनेक माजी नगरसेवकांनी लोकसभेची भूमिका वेगळी आहे, पण विधानसभेला मात्र आम्ही तुमच्या सोबतच राहू असं सुरेश भाऊ यांना सांगितलं होतं.
दरम्यान, लोकसभे वेळी मिरज पॅटर्नमध्ये असलेले आणि नसलेले जवळपास सर्वच पक्षातील माजी नगरसेवक आणि नेत्यांनी आता मात्र पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्यासोबत राहण्याचे जाहीर केल आहे. सुरेश भाऊ खाडे यांचे संघटन कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध झाल आहे. मिरजेत दिग्गज असणारे मात्र एकमेकांच्या विरोधात असणारे माजी नगरसेवक सुद्धा एकत्र आले आहेत.
मिरजेच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री खाडे यांचा प्रचार करणार असल्याचं माजी नगरसेवक आणि मिरज पॅटर्न मधील सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर केलं आहे, यावेळी मिरज पॅटर्न मधील सर्व नगरसेवकांच्या वतीने पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी युवा नेते सुशांत भाऊ खाडे, माजी महापौर इद्रिस नायकवडी, माजी महापौर संगीता खोत, ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे, माजी नगरसेवक गणेश माळी, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, माजी नगरसेवक निरंजन आवटी, माजी नगरसेवक, संदीप आवटी, काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय मेंढे, माजी नगरसेविका बबिता मेंढे, नगरसेवक अत्तर नायकवडी, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, आर पी आय युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे, भाजपाचे नेते गजेंद्र कल्लोळी, राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत हुलवान, पूर्व मंडल अध्यक्ष सुमेध ठाणेदार यांच्यासहित विविध पक्षातील नेते उपस्थित होते.