सांगलीत भरदिवसा घरफोडी ; तब्बल सतरा तोळे दागिने लंपास

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
विश्रामबाग परिसरात असणाऱ्या गव्हर्मेंट कॉलनीतील बस स्थानकामागे असणाऱ्या अपार्टमेंटमधील फ्लॅट चोरट्याने भरदिवसा फोडला. लाकडी कपाटातील १७ तोळे सोन्याचे दागिने लंपास करुन चोरट्यांनी पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याबाबत दत्तात्रय संपतराव पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी दत्तात्रय पाटील हे विद्युत कंत्राटदार म्हणून कार्यरत आहेत. गव्हर्मेंट कॉलनी येथे असणाऱ्या बस स्थानकाच्या मागील बाजूस असणाऱ्या मातृछाया अपार्टमेंटमध्ये ते तिसऱ्या मजल्यावर राहतात. नेहमीप्रमाणे दत्तात्रय पाटील हे सकाळी १०. ३० च्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांच्या पत्नी या खाजगी नोकरी करीत असल्याने त्या देखील बाहेर गेल्या होत्या. घराला दोन दरवाजे आहेत. मात्र गडबडीत फिर्यादी दत्तात्रय हे बाहेरील लोखंडी दरवाज्याला कुलूप लावण्यास विसरले होते. ते दुपारी घरी आले असता त्यांना लाकडी दाराला लावलेले कुलूप तोडलेले आढळले. सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत दरम्यानच्या कालावधीत चोरट्यांनी फ्लॅटचा कडी – कोयंडा न उचकटता कटावणीच्या सहाय्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील कपाटातील साहित्य विस्कटून १७ तोळ्याचे सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला.