सागर गुल्हाने यांची भाजपच्या “युवा शहराध्यक्ष” पदी नियुक्ती

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपाने पदाधिकार्यांच्या नियुक्त्या केल्या. मंगरुळपीर येथे भाजपने युवा शहराध्यक्षपदाची हरहुन्नरी,सामाजिक कार्यात अग्रेसर व उत्कृष्ट संघटन कौशल्य असणार्या महाराष्ट्र शासन शिवछञपती क्रिडा पुरस्कार प्राप्त सागर गुल्हानेच्या हाती कमान सोपवली आहे.
अल्पावधीतच आपल्या सामाजिक कार्याचा ठसा जनमाणसात उमटवलेल्या महाराष्ट शासनाच्या शिवछञपती क्रिडा पुरस्कार प्राप्त सागर गुल्हाने यांच्या कार्याची दखल घेवून भाजपाने मंगरुळपीर युवा शहराध्यक्ष पदाची धुरा दिली. माझ्यासारख्या एका सामान्य युवकाला ही संधी दिल्याबद्दल मी सर्व वरिष्ठांचे अत्यंत आदरपूर्वक आभार मानतो. भारतीय जनता पक्षाचे ब्रीद वाक्य ‘प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः’ याप्रमाणे मी कार्य करेन, अशी ग्वाही सर्वांना देतो. माझ्या कार्यक्षेत्रात युवा मोर्चाचे संघटन आणखी बळकट करण्यासाठी आणि भारतीय जनता पक्षाचे विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी मी सर्वांच्या सहकार्याने काम करेन.
आद. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे, तसेच आद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ही विकासाच्या दिशेने मोठे पावले टाकत आहे. अशा स्थितीत पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातून आलेल्या युवकावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी निश्चितच सार्थ करून दाखविन”.तसेच पक्षाने टाकलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार मानत नियुक्तीपञ स्विकारतांना सागर गुल्हाने यांनी मत व्यक्त केले आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे.