सातारा मतदारसंघात 20 नवीन केंद्रे ; केंद्रांवरील बंदोबस्तासाठी 464 पोलिस कर्मचार्यांची नियुक्ती

LiVE NEWS | UPDATE
सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
येत्या विधानसभा निवडणूकीसाठी सातारा मतदारसंघात 20 नवीन केंद्रे निर्माण झाली आहेत. निवडणुकीसाठी विविध पथके स्थापन करण्यात आली असून, मतदान केंद्रांवरील बंदोबस्तासाठी 464 पोलिस कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सातारा विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 41 हजार 408 इतके मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 70 हजार 851 पुरुष, 1 लाख 70 हजार 520 स्त्री आणि इतर 37 मतदार आहेत. या विधानसभा मतदारसंघात 20 नवीन मतदान केंद्रे तयार झाली आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील 14 तर शहरातील 6 मतदान केंद्रांचा समावेश आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 31 नोडल अधिकारी, 14 भरारी पथके, 13 स्थायी निगराणी पथके, 8 व्हिडीओ सर्विलेंन्स पथके, 1 व्हिडीओ पाहणी पथक स्थापन करण्यात आले आहे. या मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्त राहणार असून, त्यासाठी 464 पोलिस कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या मतदारसंघातील 232 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.
सातारा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली आहे. जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कारवाई करणार.
मा. सुधाकर भोसले, प्रांताधिकारी