सात-बारा उताऱ्यावरच बोगस नावे टाकून शासनाची फसवणूक करून खरेदी दस्त

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज शहरातील व परिसरातील जमिनींना कोट्यवधी रुपयांचा भाव आल्याने बोगस खरेदी खतांचा सुळ-सुळाट झाला आहे. या माध्यमातून अनेकांना टोप्या लावल्या जात आहेत. अनेकदा जमीन खरेदी-विक्री करताना बोगस कागदपत्रे सादर केली जातात. तर अनेकदा व्यवहार करताना बोगस व्यक्ती उभ्या केल्या जातात. अशीच घटना मल्लेवाडी (ता. मिरज) येथे घडली आहे. चक्क सात – बारा उताऱ्यावरच बोगस नावे टाकून शासनाची फसवणूक करून खरेदी दस्त तयार करण्यात आला आहे. याविषयी परशुराम बनसोडे यांनी फसवणूकीच्या व्यवहाराची तक्रार जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
मल्लेवाडी येथील गट नंबर ५०२/४ या ठिकाणी जमीनीचा असा प्रकार घडला आहे. जमीन खरेदी करताना सातबारा उताऱ्यावर बोगस नावे टाकून खरेदी दस्त तयार करण्यात आला आहे. खरेदी दस्त करणाऱ्या निबंधकाची दिशाभूल करून जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे तात्काळ बोगस खरेदी दस्त करणाऱ्या एजंट व दुय्यम निबंधक महसूल मधील अधिकारी यांच्यावर प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली व उपविभागीय अधिकारी मिरज व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य तती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आले आहे.
मिरज पूर्व भाग व आसपासच्या परिसराधील जमिनीच्या प्लॉटिंगच्या खरेदी-विक्री करून मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेची फसवणूक होत आहे. मिरज तालुक्यातील वड्डी – विजयनगर – मालगाव अशा अनेक ठिकाणी प्लॉटिंग चे काम सध्या सुरू आहे. या ठिकाणची ही खरेदी विक्री प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तात्काळ चौकशी करून संबंधितांना न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे