महाराष्ट्र राज्यराजकारण

सौ. रूपाली माने यांची शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड

उपसरपंचपदाच्या रुपाने मिळालेल्या संधीचे सोने करणार, ; शासनाच्या योजना तळागाळात पोचवणार

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

मिरज तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिंदेवाडी गावाच्या ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंच पदी सौ. रूपाली पोपट माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते उपसरपंच सौ.सविता पाटील यांचा उपसरपंच पदाचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. या रिक्त जागेवर रूपाली माने यांची निवड झाली. या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. सरपंच रेखाताई सुतार यांच्या हस्ते रूपाली माने यांचा सत्कार करण्यात आला.

सरपंच रेखाताई सुतार यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड पार पडली. यावेळी उपसरपंच पदासाठी रूपाली माने यांचा एकमेव एकच अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक जयश्री नागरगोजे यांनी कामकाज पाहिले.

उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल भावना व्यक्त करतांना नवनिर्वाचित उपसरपंच रूपाली माने म्हणाल्या की, उपसरपंचपदाच्या रुपाने मिळालेल्या संधीचे सोने करणार, ग्रामस्थांना अधिकाधिक सुविधा देण्यात येतील व शासनाच्या योजना तळागाळात पोहोचविण्याचे काम प्रभावीपणे होईल. ग्रामस्थांचे स्थानिक प्रश्न समजावून घेऊन विकासासाठी कटीबद्ध आहे. गावातील रस्ते, पाणी योजना, स्वच्छता ही कामे अग्रक्रमाने हाती घेऊ तसेच सरपंच व सदस्यांना विश्वासात घेऊन जनतेचे प्रश्न सोडवून शिंदेवाडीच्या विकासाची परंपरा कायम ठेवू.

यावेळी सरपंच रेखाताई सुतार, पोलीस पाटील शैलजा सुतार, प्रहार जिल्हाध्यक्ष सुनील सुतार, युवा जिल्हाध्यक्ष ओम भोसले, सर्जेराव शिंदे, आकाश शिंदे, राजू कदम, माजी उपसरपंच संदीप पाटील, लक्ष्मण साळुंखे, उत्तम पाटील, अविनाश रणदिवे, बापू शिंदे, महादेव लवटे, सुरेश रणदिवे, सुधीर रणदिवे, दिनेश दिवटे, शिवाजी कवाळे, किशोर साळुंखे, संभाजी पाटील, रवींद्र सुतार, निवृत्ती साळुंखे यासह आदींची उपस्थित होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही