दुर्गामाता मूर्ती विसर्जन करताना तीन जण बुडाले : दोघांना वाचवले तर एकाची शोध मोहिम सुरू

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
महाराष्ट्रासह विविध राज्यातून दसरा सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दुर्गामाता देवीच्या मिरवणुकीनंतर कृष्णा घाट येथे विसर्जन करताना बाप-लेलं असे तीनजण बुडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
काल विजयादशमी दुर्गामाता देवीचे विसर्जनाची सुरुवात सकाळपासून झाली होती. मिरजेत ६० पेक्षा अधिक मंडळाच्या दुर्गामाता विसर्जनासाठी गणेश तलाव या ठिकाणी महापालिकेकडून विसर्जनाची तयारी केली होती. पण काही नवरात्र उत्सव मंडळांनी कृष्णा घाट या ठिकाणी सुद्धा दुर्गामाता विसर्जन केले. त्यामध्येच सुभाष नगर येथील अंबिका नवरात्र उत्सव मंडळ यांच्या दुर्गामाता आईचे विसर्जन हे कृष्णा घाट या ठिकाणी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते विसर्जन करण्यासाठी गेले असताना लक्ष्मण मोरे (वय ४५) अमित गायकवाड (वय-१८) आणि अमोल गायकवाड (वय-१७) हे दोघे भाऊ बुडाले होते.
आयुष हेल्प लाईन आपत्कालीन पथकाचे सदस्य श्री योगेश आनंदे यांनी तात्काळ पाण्यात उडी घेऊन त्यातील अमोल गायकवाड, लक्ष्मण मोरे याला वाचवण्यात यश आले असून, अमित गायकवाड याचा कृष्णा नदी पात्रात शोध सुरू आहे. अमोल गायकवाड याला शासकीय रुग्णालय मिरज या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना काल रात्री घडली आहे. तात्काळ आयुष हेल्पलाइन टीम घटनास्थळी दाखल होऊन सदर नदीपात्रामध्ये शोध मोहीम रात्री उशिरा पर्यंत सुरू केली. बराच वेळ नदीपात्रात शोध मोहीम राबवण्यात आली. आज सकाळी परत शोध मोहीम सुरुवात करण्यात आली.
अमित गायकवाड हा त्याच्या आईवडिलांसोबत सुभाष नगर साई कॉलनी या ठिकाणी राहत होता तो बारावी शिक्षण घेत एमआयडीसी या ठिकाणी पार्ट टाईम जॉब करत होता. त्याची आई वडील हे रोजंदारी करून आपले कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत आहेत. तसेच त्याच्या घराची जबाबदारी त्याच्यावरही होती. पण काळाच्या घालामुळे कुटुंबावरती एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आज सकाळी परत शोध मोहिमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी यामध्ये शोध मोहीम साठी आयुष हेल्पलाइन टीम प्रमुख अविनाश पवार, नरेश पाटील, निसार मर्चंट, दिलावर बोरगावे, चिंतामणी पवार, सुरज शेख, साहिल जमादार, प्रमोद जाधव, सिद्धार्थ रण खंबे, अग्निशामक दल यावेळी उपस्थित होते.अमित गायकवाड याचा आयुष हेल्पलाइन आणि अग्निशमन दलाकडून आज सकाळपासून शोध सुरू असून अजूनही मृतदेह सापडला नाही.