चंगु-मंगुनी शासकीय गेस्ट हाऊस भानगडींसाठी ठेवले आरक्षित ; डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवास ही नाही मिळाले, केले स्व:मालकीचे – राष्ट्रवादीचे नेते महादेव दादा दबडे यांचा आरोप….

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | आदी माने
मिरज | पालकमंत्र्यांच्या कार्यालयातील चंगू मंगूचा अर्थपूर्ण तडजोड करून निधी वाटपात पुन्हा घोळ केला आहे. चंगू-मंगू नी मिरजेतील विश्रामगृह भानगडीसाठी कायम राखीव ठेवल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना विश्रामगृह मिळाले नसल्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव दादा दबडे यांनी आरोप केला आहे.
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील निधी पालकमंत्री कार्यालयातील चंगू मंगू यांनी मर्जितील गावांना दिल्याचा पर्दाफाश राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दादा दबडे यांनी केला. दोन दिवसांत कागदोपत्री पोलखोल करणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला. पालमंत्र्याचे स्वीय सहाय्यकांनी अर्थपूर्ण तडजोड करून जिल्हा परिषद समाज कल्याण नागरिक सुविधा योजनेचा निधी नियम डावलून मर्जीतील गावांना निधी दिला आहे. लोकसंख्या जास्त असलेल्या गावांना निधीपासून वंचित ठेवले आहे. पालकमंत्र्यांना माहिती न देता ज्या गावामध्ये यांचे ठेकेदारांशी आर्थिक टक्केवारी चालते याच गावांना निधी दिला असल्याचा आरोप महादेव दबडे यांनी केला. नागरीसुविधा, जनसुविधा योजने अतंर्गत एका ग्रामपंचायतीला एका वर्षात 50 लाख निधीची तरतूद असून 5 वर्षात फक्त 2 कोटी इतका निधी द्यावा लागतो. तर या चंगू मंगूनी आपल्या मर्जितील एका-एका गावाला 80 लाख दिले आहेत. असा आरोप देखील यावेळी दबडे यांनी केला.
आचारसंहिता लागल्यानंतर जिल्हा परिषद मधून 15 तारखेला काही गावांना निधी मंजूर करण्यात आला आहे. हा प्रकार आचारसंहितेचा भंग करणारा असून जिल्हा परिषद मुख्य अधिकारी यांनी कारवाई करावी. अन्यथा, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा महादेव दादा दबडे यांनी दिला आहे. या चंगू मंगूंचा कारभार विश्रामगृहात सुरू असतो. यांच्यासाठी येथील विश्रामगृह कायम राखीव ठेवण्यात येतात. काही महिन्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर कार्यक्रमानिमित्त आले होते. मात्र, चंगू- मुंगूने विश्रामगृह कायम आरक्षित ठेवल्याने त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने विश्रामगृह दिला नाही. ही मोठी दुर्दैवी गोष्ट असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पालकमंत्र्यांनी लक्ष घालून सुधारणा करावी, नाहीतर महायुतीचे नुकसान
हे दोघे पालकमंत्र्यांच्या यंत्रणेचे मालक असल्याप्रमाणे वागत आहेत भाजप आणि महायुतीतल्या अन्य पक्षासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. विकास कामे रखडल्याने जनतेच्या प्रश्नांवर तोड द्यावे लागत आहे. पालकमंत्र्याने यात लक्ष घालून सुधारणा करावी, अन्यथा यातून महायुतीचे नुकसान होण्याची भीती आहे.