रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ; कोट्यावधीचे बिल उचलून “गुत्तेदार” पसार ; इस्टिमेंट प्रमाणे काम न झाल्यास “आत्मदहन”

LiVE NEWS | UPDATE
लातूर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
निलंगा प्रतिनिधी | लातूर जिल्ह्यातील लांबोटा ते तोगरी मोड राज्य मार्ग 238 रस्त्याचे काम मागच्या चार ते पाच वर्षापासून संथगतीने व निकृष्ट दर्जाचे होत आहे. एक वर्षापासून रोडचे काम बंद आहे. अर्धवट काम सोडून गुत्तेदार पसार झाला आहे. सदर रस्त्याच्या कामास जाणून-बुजून विलंब करणाऱ्या ड्रीम कंट्रक्शन नंदुरबार या गुत्तेदारावर दंडात्मक कारवाई करून काळ्या यादीत टाकून परवाना रद्द करावे व चौकशी पूर्ण होईपर्यंत कामाचे बिल (देयके) रोखण्यात यावे, संबंधित कामावर नियंत्रित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करणे व अनेक वेळा तक्रार, उपोषण व आंदोलन करून ही तक्रारीची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कठोर शिस्तभंगाची व दंडात्मक कार्यवाही करावी, अशी तक्रार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी दिली.
सविस्तर बातमी अशी की, लांबोटा तोगरी मोड राज्य मार्ग या रस्त्याच्या कामात गुत्तेदार व कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याने कामाचा दर्जा घसरला आहे. रस्त्याच्या कामासाठी अपेक्षित मटेरियल कमी प्रमाणात वापरण्यात आले आहे. रस्त्याची अवस्था एवढी वाईट झाली आहे की, रोड उखडून मोठमोठे खड्डे पडत आहेत. रस्त्याच्या कामामध्ये BC बीसी (वरचा लेअर) 75 टक्के बाकी आहे. केदारपुर पाटी मंदिराजवळ ते वलांडी पर्यंत व देवणी ते तोगरी मोड पर्यंत BC बीसी (वरचा लेअर ) डांबरचे काम बाकी आहे. तक्रार देताच सदर कामातील भ्रष्टाचार आपल्या अंगलट येणार व आपले पितळे उघडे पडणार या भीतीने उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग निलंगा हे खोटे नाटे पत्रव्यवहार करून जुने फोटो पाठवून रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम चालू आहे. असे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे.
सदर रस्त्यावर नवीन पुलाचे कामे अद्याप करण्यात आले नाही. पुलाचे कामे रडखडलेली आहेत. 40 वर्षांपूर्वी झालेल्या पुलाचे बांधकाम जैसे थे तैसे ठेवून त्या पुलाच्या बाजूस काहीं ठिकाणी पाईप टाकून रुंदी वाढविण्यात आली आहे तर अनेक ठिकाणी जे जुने अरुंद पुल आहेत ते अपघाताचे केंद्र बनले आहे. पुलाचे विस्तारीकरण, रुंदीकरण किंवा डागडुजी काहीच न झाल्यामुळे तसेच पुलाच्या अलीकडे व पलीकडे दिशादर्शक फलक, सावधानाचा इशारा देणारे फलक, रेडियम फलक, रेडियम पट्ट्या काहीच न लावल्याने हे पूल मौत का कुवां बनला आहे.
सदर रस्त्याचे काम जलद गतीने व इस्टिमेंटप्रमाणे करण्यात यावे अन्यथा, दि.24/02/2025 रोजी मंत्रालयाच्या मेन गेट समोर नाविलाजास्तव अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करीत असल्याचे आत्मदहन कर्ती आसिया रिजवी यांनी निवेदनात नमूद केले आहे.