जिल्हा परिषदेच्या निधी वाटपात गडबड ; आंदोलनाचा इशारा

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा परिषदेच्या निधी वाटपात गडबड असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट प्रहार जनशक्ती पक्षाचे मिरज तालुका अध्यक्ष परशुराम बनसोडे यांनी आज केला. या सगळ्या गडबडीच्या चौकशीची मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सांगली जिल्हा परिषद, सांगली यांचे वतीने दि. १०/२/२५ रोजी झालेले काम वाटप हे असंविधानीक आहे. इच्छापत्र व चलन भरवयाच्या शेवटच्या दिवशी दि. ०७/०२/२०२५ रोजी अचानकच येत काम सोडले तर बाकीची सर्वच कामे दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास पोर्टलला दिसण्यास सुरवात झाली. त्या कामाचे चलन डाउनलोड करून सही घेऊन बँकेत जाऊन पैसे भरण्यासाठी एक तासाचा अवधी देण्यात आला. त्यामुळे सु.बे. अभियंता चलन भरण्यापासून वंचित राहिले. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असून शेवटच्या काही क्षणांत काही कामे मॅनेज करण्यात आली.
सदरच्या मॅनेज झालेल्या काम वाटप कामांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे मिरज तालुका उपाध्यक्ष परशुराम बनसोडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. येणाऱ्या आठ दिवसांत या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे.