अमित तांबे यांचा सत्कार सोहळा नंदगिरी गेस्ट हाऊस येथे संपन्न

LiVE NEWS | UPDATE
मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते नवनिर्वाचित उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष पदी मा. अमित जनार्दन तांबे यांची नियुक्ती झाल्याबद्दल नंदगिरी गेस्ट हाऊस येथे भव्य सत्कार सोहळा पार पडला.
या सत्काराचे आयोजन मुंबई प्रदेश अध्यक्ष मा. सिध्दार्थ दादा कासारे यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमास रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) चे सरचिटणीस गौतम भाऊ सोनावणे, स्विप सहाय्यक प्रविण मोरे, मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, चिरनकर सर, टायगर ग्रुप मुंबई अध्यक्ष तसेच पश्चिम मध्य मुंबई तालुका अध्यक्ष मा. संजय भाऊ खंडागळे, युवक नेता सचिन मोहिते, रोजगार आघाडी मुंबई प्रदेश उपाध्यक्ष उमेश मराडे, जिल्हा उपाध्यक्ष कुणाल जाधव तसेच उत्तर मध्य व पश्चिम मध्य मुंबईचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऊर्जावान वातावरणात करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मा. अमितजी तांबे यांचा सत्कार करून त्यांच्या आगामी वाटचालीसाठी अनंत मंगलमय शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमात फोटोग्राफर देवेंद्रजी आणि महेश लंकेश्वर यांनी देखील सहभाग घेतला.
या प्रसंगी मा. अमितजी तांबे यांनी सर्व मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानत पक्षाच्या बळकटीसाठी निष्ठेने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.