LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
आपत्तींचे धोके कमी करणे आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत सजगता वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्ती धोके निवारणाची शपथ दिली.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील आणि निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले.