डॉ.. बापूजी साळुंखे महाविद्यालयात फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि मिठाई वाटप
LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांनी विजय संपादन केल्याबद्दल मिरजेतील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात मिरजेचे आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि मिठाई वाटप करून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.

कौस्तुभ गावडे यांच्या विजयाबद्दल आयोजित या आनंदोत्सवात आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि गुरुदेव बंधू-भगिनींनी एकत्र येत आनंद व्यक्त केला. संपूर्ण महाविद्यालय परिसर जल्लोषाने दुमदुमून गेला होता.

यावेळी नगरसेवक मोहन वाटवे, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब आळतेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन जाधव, माजी प्राचार्य विष्णू पाटील, रजिस्ट्रार रावसाहेब लवटे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. आकाश बनसोडे, डॉ. हडताळे, एम. बी. ज्युनिअर विभागाचे इन्चार्ज के. बी. पाटील, डॉ. संजय शेंडगे, डॉ. शहीदा जमादार, प्रा. सुचिता पाटील, डॉ. पुष्पा पाटील, डॉ. स्वाती हाके यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि गुरुदेव बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी दिनदलित, कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक महाविद्यालये सुरू झाली असून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत यश संपादन केले आहे. याच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी शिक्षक आमदारपदी विजय मिळवल्याने संस्थेच्या शैक्षणिक परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा आनंद साजरा करताना आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. उपस्थितांनी कौस्तुभ गावडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.