LiVE NEWS | UPDATE
सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लिमिटेड, दौलतनगरचे कर्तव्यदक्ष चेअरमन, युवा नेते मा. यशराज शंभूराज देसाई (दादा) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मरळी (ता. पाटण) येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळ निवारणासाठी 'मुख्यमंत्री सहायता निधी'मध्ये आर्थिक मदत देऊन एक नवा वस्तूपाठ घालून देण्यात आला.
​पंचायत समिती सदस्या सौ. संपदा संदीप जाधव यांच्या वतीने दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीचा धनादेश लोकनेते देसाई कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई दादा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

​लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे तरुण नेतृत्व यशराज देसाई दादा यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा फटक्यांची आतषबाजी आणि डिजिटल फ्लेक्सबाजीला फाटा देण्यात आला. पाटण तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचे भान ठेवून गरजू व दुष्काळग्रस्त नागरिकांना दिलासा मिळावा, या उदात्त हेतूने हा निधी संकलित करून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला.

​यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्या सौ. संपदा संदीप जाधव म्हणाल्या, "यशराज देसाई दादांचे नेतृत्व पाटण तालुक्याला नव्या दिशेने घेऊन जाणारे आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ सत्कार स्वीकारण्यापेक्षा समाजातील घटकांना मदत करणे. या भावनेतून आम्ही हा मुख्यमंत्री सहायता निधीचा धनादेश देत आहोत.

​मरळी येथे पार पडलेल्या या छोटेखानी आणि शिस्तबद्ध कार्यक्रमास साखर कारखान्याचे संचालक मंडळ, स्थानिक लोकप्रतिनिधी, महायुती व शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मरळी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी यशराज देसाई यांना उदंड आयुष्याच्या व वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.