EVM मशीन हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत २००९ च्या मतदार यादीनुसार मतदान घेण्यात यावे, तसेच भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेऊन त्यांना अटक करावी, या प्रमुख मागण्यांसाठी १० ऑक्टोबर २०२६ रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला समर्थन देत बहुजन कृती समिती, कारंजा लाड यांच्या वतीने महामहिम राष्ट्रपतींच्या नावे तहसीलदार, कारंजा लाड यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, CJP आणि विरोधी पक्षांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाच्या तीन प्रमुख मागण्या आहेत.
निवेदनातील प्रमुख मागण्या :
१. EVM मशीन हटवून मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात.
२. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा तातडीने राजीनामा घेऊन त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
३. SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत, कोट्यवधी मतदारांची नावे वगळण्यात आल्याने २००९ च्या मतदार यादीनुसार निवडणुका घेण्यात याव्यात.
देशातील लोकशाही आणि संविधान सुरक्षित राहावे, निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात आणि जनतेच्या मतातून सरकार स्थापन व्हावे, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. तसेच सर्व जाती-धर्मांतील नागरिकांचा सर्वांगीण विकास होऊन भारत समृद्ध व्हावा, या उद्देशाने वरील मागण्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
या मागण्या मान्य न झाल्यास बहुजन कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर किशोर मानकर, गजानन अहमदाबादकर, प्रदीप वानखडे, हंसराज शेंडे, अनिल ढेरे, राम शेजव, सुजित भगत, अमन उके, राजू दिघडे, विजय वानखडे, परसराम वासनिक, जावेद हसन गारवे, प्रा. दादाराव भगत, अनंत खडसे, सूर्यकांत लांडगे, चंद्रमणी भगत, विलास राऊत, अमोल कडू, चांदभाई मुन्निवाले, निलेश चव्हाण, संजय गोहर, नितीन घोगलिया, हृतिक गोहर, विजय गागरे, संदीप वरघट, दुर्योधन मनवर, श्रीकृष्ण वनारसे, ज्योती मनवर, राम नाखले, विजय देशमुख आणि सुजित भगत यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

