LiVE NEWS | UPDATE
अमरावती | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी वैध नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या ३० उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी आज अखेर आपली उमेदवारी मागे घेतली आहे.

निवडणूकीतून उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांमध्ये सुनिल दुर्गादास राठोड (अपक्ष), नितीन सुभाषराव आगे (अपक्ष), सजील खान खलील खान (अपक्ष) आणि प्रिती हर्षल रेवणे (राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी) यांचा समावेश आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या रिंगणात आता अंतिमतः २६ उमेदवार आहेत.भारत निवडणूक आयोगाच्या जाहिर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानूसार शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अमरावती येथे मतमोजणी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त अमरावती यांनी कळविले आहे.