ज्ञानेश्वर महाराज सार्वजनिक वाचनालयाचा पुढाकार; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
तपोवन येथील ज्ञानेश्वर महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त मराठी वाचनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात गावातील नियमित वृत्तपत्र वाचकांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मराठी भाषेच्या वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.
मराठी भाषेचे वाचन, संवर्धन आणि तिच्याविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने वाचनालयाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपण्यासाठी वाचन संस्कृती वाढविणे आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी दिगंबर हरिनारायण येवले, गजानन देवमन येवले, गजानन अर्जुन बायस्कार, भगवान उकंडा सावध, भीमराव हरिनारायण येवले आणि प्रकाश शेषराव वानखडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सुधीर गावंडे यांनी उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.

