वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण तहसीलदार कार्यालय, मंगरुळपीर लगतच्या जुण्या पंचायत समिती सभागृह येथे सोडतीद्वारे जाहीर करण्यात आले. या सोडतीनुसार तालुक्यातील एकूण 76 ग्रामपंचायतींसाठी प्रवर्ग निहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तहसीलदारांच्या स्वाक्षरीने ही अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रवर्गनिहाय आरक्षण असे....
अनुसूचित जाती (SC) - 17 जागा
सर्वसाधारण 8 जागांमध्ये इंचा, नांदगाव, दाभडी, गिंभा, चिखली, कळंबा बु., लावणा आणि पिंपळखुटा या गावांचा समावेश आहे. तर महिला करिता 9 जागांमध्ये इचोरी, शिवणी रोड, कुंभी, लाठी, बिटोडा भोयर, सायखेडा, धानोरा खुर्द, पिंप्री बु. अवगन आणि दस्तापूर (ईश्वर चिठ्ठी) या गावांचा समावेश आहे.
अनुसूचित जमाती (ST) - 5 जागा
व्यक्ती करिता धोंत्रा, शेलू खुर्द आणि मोहरी तर महिला करिता चांभई आणि जनुना बु. (ईश्वर चिठ्ठी) हे आरक्षण निघाले आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) - 16 जागा
व्यक्ती करिता पेडगाव, कोळंबी, भडकुंभा, भुर, कोठारी, बोरव्हा खुर्द, सावरगाव आणि जांब तर महिला करिता पोटी, गोलवाडी, शिवणी द., आसेगाव, चेहेल, वनोजा, मानोली आणि वसंतवाडी (ईश्वर चिठ्ठी) या ग्रामपंचायती आहेत.
सर्वसाधारण प्रवर्ग (GEN) - 38 जागा
हा सर्वात मोठा प्रवर्ग असून यामध्ये सर्वाधिक 38 गावांचा समावेश आहे.
सर्वसाधारण व्यक्ती (19): हिसई, पोघात, मसोला बु., चांधई, चोरद, वरुड बु., पिंप्री खुर्द, निंबी, अरक, सार्सी बोध, सनगाव, शेगी, चिंचखेडा, माळशेलू, त-न्हाळा, कासोळा, येडशी, कवठळ, नांदखेडा.
-सर्वसाधारण महिला (19): शेंदुरजना मोरे, तपोवन, पार्डी ताड, पारवा, खडी, पिंप्री बु., मंगळसा, बेलखेड, शेलगाव, कंझरा, हिरंगी, गोगरी, जोगलदरी, चिखलागड, मोतसवंगा, फाळेगाव, रामगड, पिंपळगाव आणि दाभा.
सदर आरक्षण सोडत प्राधिकृत अधिकारी तहसिलदार,नायब तहसिलदार तसेच सबंधित कर्मचारी व जनतेच्या उपस्थितीत पार पडले. या आरक्षण सोडतीनंतर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून अनेक गावांमध्ये सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

