गेल्या ४८ तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्यात आली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
राधानगरी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला असून पुढील २४ तास महत्त्वाचे असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

