LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विवाहित महिलेचा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केल्याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
निता अनिकेत अधानक (वय २७, सध्या रा. बेलखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती अनिकेत अधानक (रा. कव्हाळा जहागीर, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) आणि अन्य तिघांनी आपापसांत संगनमत करून त्यांचा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केला. तसेच माहेरून एक लाख रुपयांची मागणी करून त्यांना सतत त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या छळाला कंटाळून पीडितेने पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे मंगरूळपीर पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

