LiVE NEWS | UPDATE.
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मंगरुळपीर | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने यवतमाळ जिल्ह्यासाठी लोकसभा, जिल्हा आणि विधानसभा प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या नियुक्त्यांमध्ये मंगरुळपीर येथील रहिवासी आणि सक्रिय काँग्रेस नेते जावेद सौदागर यांची पुसद विधानसभा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा जावक क्रमांक ४३३/२०२६, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजीचा नियुक्ती आदेश यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. सचिन नाईक यांना प्राप्त झाला आहे.
जावेद सौदागर हे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव असून, पक्षाचे निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी यापूर्वीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
सौदागर यांच्या नियुक्तीनंतर पुसद विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विविध ठिकाणी त्यांचे अभिनंदन केले जात आहे. या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून पुसद विधानसभा क्षेत्रात काँग्रेस संघटनेला नवी उभारी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीमुळे पुसद विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या संघटनात्मक हालचालींना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.