वाशिम शहरातील देवपेठ परिसरातील घटना; सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, विविध जिल्ह्यांत शोधमोहीम, कुटुंबीयांची चिंता वाढली
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
शहरातील देवपेठ परिसरातील कु. पौर्णिमा संतोष पेंढारकर (वय अंदाजे १० ते १२ वर्षे) ही अल्पवयीन मुलगी बुधवार, ४ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाली असून, तिला बेपत्ता होऊन तब्बल १३ दिवस उलटले आहेत. मात्र, अद्याप तिचा शोध लागलेला नसल्याने कुटुंबीयांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. मुलगी सुखरूप घरी परत यावी, या आशेने कुटुंबीय तिची प्रतीक्षा करीत आहेत. दुसरीकडे, वाशिम शहर पोलिसांकडून तिचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पौर्णिमा शहरातून बेपत्ता झाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तिच्या शोधासाठी तपास सुरू करण्यात आला. मात्र, १३ दिवसांचा कालावधी उलटूनही तिचा ठावठिकाणा लागलेला नाही.
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, संभाव्य मार्गांचा शोध, संबंधित व्यक्तींकडे चौकशी तसेच विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. या प्रकरणी विविध जिल्ह्यांमध्येही तपास करण्यात आला असून, अद्याप मुलीचा शोध लागलेला नसल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.
बेपत्ता मुलीचे वर्णन व संपर्क क्रमांक
बेपत्ता पौर्णिमेची उंची अंदाजे साडेचार फूट असून, तिचा बांधा सडपातळ, रंग गोरा, केस काळे व लांब आहेत. तिच्याबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास खालील क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
- पोलीस निरीक्षक किरण दांडगे : ७४०७१००१००
- पोलीस पाटील गजानन काळे : ९६८९८९७५३५
- मुलीचे भाऊ गोविंद पेंढारकर : ९५२९३०२६३२
अल्पवयीन मुलीचा शोध अद्याप लागलेला नसल्याने कुटुंबीयांची प्रतीक्षा आणि चिंता वाढली आहे. नागरिकांनी मुलीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास विलंब न करता पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

