सामाजिक कार्यकर्त्या छायाताई वानखडे यांची प्रमुख उपस्थिती; ग्रामस्थ व समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मंगरूळपीर तालुक्यातील खडी येथे १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी समाजाचे महानायक, क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले.
या जयंती सोहळ्याला सामाजिक कार्यकर्त्या छायाताई वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजात एकता, शिक्षण, सामाजिक जागृती आणि संघटन अधिक मजबूत करण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला.
या कार्यक्रमाला मोझरी येथील शैलेश राठोड, रामेश्वर राठोड, मंगळसा येथील संदीप वानखडे, तसेच खडी गावातील माजी सरपंच ज्ञानेश्वर पांडे, युवराज गोडबोले, रुपेश चव्हाण, कैलास गिर्हे, निलेश गिर्हे, गणेश खुळे, विजय वाघमारे, रामदास खुळे, सुखदेव गोदमले, किसन ढगे, बर्गे, संतोष कोते, बाळू खंडाळकर, जगदीश गिर्हे, रुपेश खंडाळकर, गजानन घोंगडे, नंदकिशोर वाघमारे, अमित कांबळे, सूरज गोडबोले, कार्तिक भगत, भूषण भगत, रामदास अंभोरे, राजेश अंभोरे, विकास कांबळे, प्रशिक चव्हाण, सुजीत भगत आदींसह गावातील नागरिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त खडी येथे सामाजिक एकतेचा आणि महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात हा जयंती सोहळा पार पडला.

